Friday, May 9, 2025

महाराष्ट्रदेशमहत्वाची बातमी

‘आयसीजेएस’ प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त

‘आयसीजेएस’ प्रणालीत महाराष्ट्र पोलिसांना देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालय व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (एनसीआरबी) यांच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टम (आयसीजेएस) या विभागातील “पोलिस सर्च’ वर्गवारीमध्ये महाराष्ट्र पोलिसांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.


तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक अर्चना कदम, पोलिस कर्मचारी संदिप शिंदे व प्रियांका शितोळे या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला आहे.


गृहमंत्रालय व एनसीआरबी यांच्यातर्फे दिल्ली येथे “सीसीटीएनएस व आयसीजेएस’ ही परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेमध्ये महाराष्ट्राला “आयसीजेएस’ या वर्गवारीमध्ये पारितोषिक मिळाले आहे.


तसेच, राज्यात सीसीटीएनस व आयसीजेएस प्रणाली अतिशय उत्तम पद्धतीने व परिणामकाकरीत्या राबविल्याबद्दल “सीआयडी’च्या पोलिस उपनिरीक्षक अर्चना कदम, पोलिस नाईक संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांना उत्कृष्ट वैयक्तीक कामगिरीबद्दल गौरविले. “सीआयडी’चे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी “आयसीजेएस’ कार्यप्रणाली यशस्वीपणे राबविली आहे.


संबंधीत कार्यप्रणालीचा वापर करुन गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, चारित्र्य पडताळणी, पोलिस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी, गुन्हेगाराच्या कार्यपध्दतीचा शोध, शस्त्र परवाना इत्यादीचा प्रभावीपणे वापर केला. त्यामध्ये 1990 गुन्हे उघडकीस आणले.


हरवलेल्या व बेवारस मयतांचा शोध 13 हजार 848 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, एक लाख 59 हजार 203 व्यक्तींची चारित्र्य पडताळणी केली. या सगळ्या कामाची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांची संबंधित पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment