मुंबई : चार दिवसांपूर्वी स्पायडर मॅनच्या सीरिजमधील शेवटचा स्पायडर मॅन नो वे होम (spider man no way home) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि त्यानं इतिहास निर्माण केला आहे. स्पायडर मॅनच्या (spider man no way home) या चित्रपटानं तीन दिवसांत चक्क शंभर कोटी रुपये कमावले आहे. आतापर्यत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. अशी कामगिरी करणारा सोनी प्रॉडक्शनचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या जगभरातून स्पायडर मॅनवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. स्पायडर मॅनच्या यापूर्वीच्या भागांना देखील प्रेक्षकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स यांनी पुरेपूर भरलेल्या स्पायडर मॅनच्या सीरिजमधील शेवटचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो पाहण्यासाठी ज्येष्ठांपासून लहानांपर्यत सर्वांनीच गर्दी केल्याचे दिसून आले आहे.
जेव्हा स्पायडर मॅन नो वे होम प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्वात मोठा बिझनेस केल्याचे दिसून आले. यापूर्वी कोणत्याही चित्रपटाला असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, ‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ चित्रपटाच्या कमाईने पहिल्या दिवशी ३५ कोटींचा आकडा पार केला होता. तर आता तिसऱ्या दिवशी शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. शुक्रवारच्या तुलनेत चक्क ३० टक्क्यांची वाढ या चित्रपटाला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्सच्या वतीनं करण्यात आली आहे. गुरुवारी या चित्रपटानं ४१.५० कोटी, शुक्रवारी २५.६७ कोटी आणि शनिवारी ३३.६७ कोटींचा व्यवसाय केला आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…