इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानावर

लंडन : भारत -इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत २ षटकात ३ विकेट्स मिळवत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या कामगिरीसह बुमराहने भारतीय जलदगती गोलंदाजानं कपिल पाजींचा विक्रमही मोडीत काढला आहे.इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता बुमराह दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. आता त्याच्या नजरा नंबर वनचा डाव साधण्यावर असतील.


इंग्लंडच्या मैदानात कपिल देव यांनी १३ कसोटी सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. यात १२५ धावांत ५ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं बेन स्टोक्सची विकेट घेताच कपिल पाजींचा हा विक्रम मागे टाकला. दुसऱ्या दिवशी दोन षटकातील ३ विकेट्स घेत बुमराहनं इंग्लंडच्या मैदानातील कसोटी सामन्यात ४६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.


इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इशांत शर्मा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहला आणखी ६ विकेट्सची आवश्यकता आहे. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या डावातील दमदार कामगिरीनंतर दुसऱ्या डावातही त्याला हा डाव साधण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या मैदानात फक्त ९ सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या होत्या. १० व्या सामन्यातच अर्धशतकी टप्पा पार करत तो टॉपर होऊ शकतो. जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात नंबर वन बॅटर हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केले होते. इंग्लंड कॅप्टनचाही त्याने त्रिफळा उडवला. एवढेच नाही तर शतकवीर जो रुटलाही त्याने अचून टप्प्यावर त्रिफळाचित केल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

Women's Under-18 Hockey : भारतीय महिला संघाची कांस्यपदकावर मोहोर

काकामिगाहारा : भारतीय महिला अंडर-१८ हॉकी संघाने महिला १८-वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

IND vs AFG : गिल-राहुलच्या शतकांनी अफगाणिस्तानवर भारताची पकड मजबूत;पहिल्याच दिवशी 368/3

न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचेच वर्चस्व

Ind vs Afg :टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहली बाहेर;यशस्वी जयस्वाल संधी !

मुंबई : अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

FIFA WORLD CUP 2026 :फिफा विश्वचषक २०२६; लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या 'लास्ट डान्स'ची रंगणार थरारक लढत!

FIFA WORLD CUP 2026 : प्रतीक्षा आता संपली आहे! कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये ११ जूनपासून सुरू होणाऱ्या २०२६ फिफा