मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने वाहतूक पोलिसांचं मनापासून कौतुक केलं आहे.
सचिनने फेसबुकवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रीणीचा भीषण अपघात झाला. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. मात्र, त्यावेळी एका वाहतूक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच ती आता बरी आहे. अपघातानंतर त्याने ताबडतोब प्रसंगावधा दाखवत तिला ताबडतोब ऑटोमध्ये बसवत रुग्णालयात नेले. ज्यानंतर मी स्वत: जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांच्यासारखे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत, जे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करतात. अशा लोकांमुळेच जग सुंदर आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांना, विशेषत: जनतेची सेवा करणाऱ्यांना भेटता तेव्हा आवर्जून त्यांचे आभार मानायला थोडा वेळ द्या. आपल्याला कदाचित माहित नसेल, पण असे अनेकजण कोणताही गाजावाजा न करता आपली मदत करत असतात आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण भारतातील वाहतूक पोलिसांसाठी, लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण एकमेंकासाठी वाहतूक नियमांचा आदर करूया आणि शॉर्टकट नको वापरुया. कारण दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्वत:चा थोडा वेळ वाचवणे योग्य नाही.
नेटकरांनी सचिनच्या या पोस्टच कौतुक करत त्यावर लाईक, शेअर आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…