पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करा - छगन भुजबळ

नाशिक : बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ''छत्रपतींचा आशिर्वाद'' असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असा इशारा सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०