पुणे : म्हाडा पेपरफुटी आणि टीईटी प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून जवळपास 88 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोनं पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी आता आणखी काही धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आणखी काही ‘बिग शॉट्स’ नाव पुढे येतील अशी चर्चा रंगतेय. . तुकाराम सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे. रात्री सुपेच्या घराची झडती घेतली तेव्हा 88 लाखांची रोकड सापडली. त्याशिवाय सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या परीक्षांमध्ये देखील असाच घोळ झाल्यानंतर अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…