निवडणुकीच्या तोंडावर मनसेत फेरबदल!

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत. दिलीप बनकर, सुमीत खांबेकर आणि वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती केली आहे. या फेरबदलाने मनसेतील धुसफुस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सप्तपदी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पक्षसंघटन मजबूत करा, असा संदेश बैठकीत देण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते अभिजीत पानसे आणि दिलीप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी सतनामसिंग गुलाटी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येकी तीन मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.


औरंगाबाद पूर्व-पश्चिम-मध्य मतदारसंघासाठी सुमीत खांबेकर, गंगापूर-वैजापूर-पैठण मतदारसंघासाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री-सिल्लोड-कन्नड मतदारसंघासाठी वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व शहराध्यक्षपदी आशिष सुरडकर आणि पश्चिम शहराध्यक्षपदी गजन गौडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 'मध्य'चे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. पक्षाचा आढावा घेऊन कार्यकारिणीत फेरपालट केले आहेत. आणखी काही निर्णय घेतले जातील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.


दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरुन तडकाफडकी हटविण्यात आले. पदभार घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत वर्णी लागली नाही. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या बदलावर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी