Friday, May 9, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

भाजपचा महाविकासआघाडीला दणका; विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप विजयी

भाजपचा महाविकासआघाडीला दणका; विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप विजयी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election) आज (14 डिसेंबर) जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर विजय मिळवून महाविकासआघाडीला दणका दिला आहे.


सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. विधान परिषदेच्या एकूण ६ जागांवर निवडणुका आयोगाने जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या. त्यामुळे त्यांचा निकाल अगोदरच लागला आहे.


मात्र, निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला-वाशिम-बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी ठरले. यामुळे या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला.

Comments
Add Comment