
कोल्हापूर (प्रतिनिधी): ऑस्ट्रेलियातून कुटुंबीयांसोबत परतलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.
ऑस्ट्रेलियातून परतलेलं हे कुटुंब रमणमळा परिसरात वास्तव्यास आहे. परदेशातून भारतात आल्यानंतर ३ डिसेंबरला या कुटुंबातील पाचही जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे पहिल्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, रविवारी कोल्हापुरात आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आला असून पाच पैकी चौघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एक करोना बाधित असल्याचं समोर आलं आहे.