Sunday, June 22, 2025

पुणे - शाळा सुरू करण्याबाबत बुधवारी निर्णय

पुणे - शाळा सुरू करण्याबाबत बुधवारी निर्णय
पुणे, राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर मतभिन्नता असून आता त्याबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करायच्या किंवा कसे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार होण्याच्या शक्यतेने काही स्थानिक प्राधिकरणांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्व प्राथमिक शाळा कधी सुरू केल्या जाणार. याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >