काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?.पवारांनी सांगितला आठवणीतला किस्सा



मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबरला ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. राज्यभरात पवार यांच्या वाढदिवसाचे सोहळे सुरू झालेले आहेत. या निमित्त मुंबईत आज लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किल्ला सांगितला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा आहे.



राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातलीच होती. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हटले, की काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असा किस्साच शरद पवार यांनी उपस्थितांना ऐकवला.


 


 

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी