एसटी संपामुळे स्थानकांतील विक्रेत्यांचा आवाज ‘बसला’

गौसखान पठाण


गेल्या महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकांमधील प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकांतील शेकडो फिरते विक्रेते, टपरीवाले, रसवंती चालक व दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप अशा भीषण परिस्थितीत उदरनिर्वाह कसा चालवावा, हा प्रश्न या सर्वांसमोर निर्माण झाला आहे.

पाणी बाटली, कोल्ड्रिंक्स पासून वेफर्स, चिक्की, वडापाव आणि फळ विक्रेते आदींचा स्थानकांतील आवाज पूर्णपणे ‘बसला’ आहे. जिल्ह्यात पनवेल, पेण, रामवाडी, अलिबाग, कर्जत, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, इंदापूर, पोलादपूर व महाड आदी बस स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची ये - जा सुरू असते. इतरही स्थानकांत ती पहायला मिळते. स्थानकांत येणारे प्रवाशी हेच या फिरते विक्रेते, छोटेमोठे हॉटेल चालक, भाजी विक्रेत्या, टपरीवाले व दुकानदारांचे हक्काचे ग्राहक असतात. मात्र स्थानकांत बसगाड्याच येत नाहीत म्हंटल्यावर प्रवाशी तरी कुठून येणार? परिणामी हे व्यावसाईक पुरते हतबल झाले आहेत. फिरते विक्रेते तर हाताला मिळेल ते काम करत आहेत. रमेश या फिरत्या विक्रेत्याने सांगितले की दिवसभर बसमध्ये खाद्य पदार्थ विकून मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर घर चालवत होतो. मात्र, संपामुळे हे काम पूर्णपणे थांबले आहे. जवळपास वर्षभर लॉकडाऊनमुळे हे काम ठप्प होते. आता कुठे बसेस सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळाले होते. त्यामुळे बरे चालले होते. मात्र काही दिवसांतच एसटीचा संप सुरू झाला आणि हातचे काम पुन्हा गेले. काय करावे कळत नाही. अशीच परिस्थिती इतरही अनेक स्थानकांतील शेकडो फिरत्या विक्रेत्यांची आहे. या असंघटित विक्रेत्यांना ना कोणता आधार आहे ना कोणती मदत. अनेक दुकानदारांनी आगाऊ माल भरून ठेवला आहे. त्यातील बरेचसे खाद्य पदार्थ आहेत. त्यांची मुदतही संपली आहे. तर काही माल खराब झाला आहे. त्यामुळे हे दुकानदार तोट्यात आहेत. एकूणच एसटी संपामुळे इतरही आर्थिक व्यवहार डबघाईला आले आहेत.


वडिलांचे बस स्थानकात छोटे दुकान आहे. महिनाभरापासून एसटीचा संप असल्याने खूप नुकसान झाले आहे. दुकानाचे भाडे देखील भरावे लागते. दुकान दिवसभर उघडे ठेवूनही ग्राहक फिरकत नाहीत. कारण स्थानकातच कोणी येतच नाही. योग्य तोडगा निघून लवकर एसटीचा संप मिटला पाहिजे.
हेमंत राऊत, व्यवसाईक, पाली
Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे