गोंदिया : पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचा-याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा येथे घडली आहे. ज्योती यशवंत बघेले (वय २८) असे मृत महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रकरण संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
ज्योती बघेले ही सालेकसा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पदावर कार्यरत होती. तिचे लग्न सन २०१७ मध्ये पांढरी पाउलदौना येथील रहिवासी रमेश गिरिया याच्याशी झाले होते. पती रमेश गिरिया सुद्धा सालेकसा पोलीस ठाण्यात सी-६० पथकामध्ये कार्यरत आहे. दोन्ही पती-पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा व आपल्या वडिलासह सालेकसा येथे भाड्याच्या घरात राहत होते.
नेहमीप्रमाणे दोन्ही पती-पत्नी आपापल्या कार्यस्थळी कर्तव्यावर गेले होते. ज्योती सालेकसा पोलीस ठाण्यात कार्य करीत असताना, अचानक ती आपल्या घरी निघून गेली, नंतर माहीत झाले की तिने आपल्या खोलीत गळफास लावला.
घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस घटनास्थळी पोहोचत ज्योतीला फासावरून खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु स्थिती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले.
आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, याची माहिती मिळू शकली नाही. सदर प्रकरण संशयास्पद असल्याचे बोलले जात असून सालेकसा पोलिसांनी प्रत्येक दिशेने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…