नालासोपारा :वसईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना अजूनही शाळांना सुट्टी देण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी शाळा सुरू ठेवण्यात आली असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पालिकेने शाळा बंद करण्याचे आदेश अजूनही काढले नसल्याने लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव पसरला, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित राहात आहे.
राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई, नाशिक आणि पुणे या पालिकांनी शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. सदर मनपा प्रशासन लहान मुलांच्या जीवाच्या विचार करत असून ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव बघता शाळा न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, दुसरीकडे वसई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही शाळा अजूनही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वसई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वसईत निर्बंध देखील कडक करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मास्क वापरण्यावरही आता सक्ती करण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती असताना वसईमध्ये अद्यापही शाळा का सुरू?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु त्यातल्या काही शाळा ६ डिसेंबर म्हणजेच सोमवारी पुन्हा बंद करण्यात आल्या; परंतु अजूनही विरार पूर्व, नालासोपारा पूर्व तसेच वसई येथे मुख्य ठिकाणी असलेल्या शाळा या अद्यापही सुरू आहेत.
विरार पूर्व हे गर्दीचे ठिकाण आहे. तसेच नालासोपारा पूर्वेला सुद्धा फेरीवाल्यांमुळे अतिशय गर्दी होत असते. त्यांच्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती असताना शाळा अजूनही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत; परंतु शाळा मालकांची यात काही चूक नसल्याचे दिसून येत आहे. कारण पालिकेने अद्यापही कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी महानगरपालिकेने शाळांबाबत अद्यापही कोणताही आदेश काढला नाही. त्यामुळेच शाळा बिनधास्तपणे सुरू ठेवण्यात आल्या आहे. काही शाळा या बंद झाल्या असून आता विद्यार्थी घरून पुन्हा ऑनलाइन शिक्षण घेत आहेत; परंतु ज्या शाळा गर्दीच्या ठिकाणी आहेत ते अजूनही सुरू असल्याने लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
कोरोनाचा तसेच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका हा दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच वसईतील पूर्व भागात जिथे घनदाट गर्दी असते, अशा ठिकाणी शाळा सुरू ठेवणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करून लहान मुलांच्या जीवाशी खेळ का सुरू ठेवला आहे?, असाही प्रश्न उपस्थित राहत आहे.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…