मुलाच्या प्रचारासाठी महावितरणची यंत्रणा वापरणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Share

मुंबई  : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवत आहेत. परंतु, या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला असून नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रांत पाटील यांनी नवी मुंबईतील वाशी येथे ६ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच, कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी? याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव’ आहे. तसेच, या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल. मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल, अशा भाषेत महावितरण चे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश करून संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला.

यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजिवांना निवडणुकीत कसे सहाय्य करावयाचे आहे, याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

Recent Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आदेश! सर्व राज्यांतल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा

अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

18 minutes ago

Eknath Shinde: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…

20 minutes ago

Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…

47 minutes ago

मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…

49 minutes ago

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…

1 hour ago

AC Compressor: उन्हाळयात ​AC कम्प्रेसर फुटून आग लागण्याचा धोका सर्वाधिक! ही घ्या काळजी

AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…

1 hour ago