आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी वरिष्ठ अधिका-याला अटक

  99

 लातूर : लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं स्पष्ट झालं आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याच पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर हा पेपर राज्यभर व्हायरल करण्यात आला. 



पुणे सायबर पोलिसांनी या प्रकणाचा तपास करत लातूरमधील आरोग्य विभागाचा सीईओ, बीडच्या मनोरुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी, उस्मानाबाद आरोग्य विभागाचा क्लार्क आणि एक शिपाई यांना अटक केली आहे. सीईओने पेपर फोडला आणि या सर्वांचा या प्रकरणात समावेश असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 



पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक केलीय. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 11 झालीय.







आरोग्य विभागाच्या 'गट ड' या वर्गासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोग्य विभागाच्या 'गट ड' परीक्षेचा पेपर परीक्षेआधी पेपर फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Comments
Add Comment

...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या

मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले

दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील

नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट, १ मृत्यू तर १७ जण जखमी, ४ कामगारांची प्रकृती चिंताजनक

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई