महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट


मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. समुद्राच्या काही भागात चक्रीवादळाची स्थिती आहे. यामुळे उत्तर कोकणासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चार दिवस मध्यम तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई - ठाण्यात मध्यम सरींची शक्यता आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


हवामान विभागाने रायगडला गुरुवारी आणि शुक्रवारी, तर रत्नागिरीला गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे. गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक