नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने अधिवक्ता सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासात सौरभ कृपाल हे पहिलेच समलैंगिक न्यायाधीश ठरणार आहेत. शिफारशीवर वाद आणि केंद्राकडून आक्षेप यामुळे गेल्या चार वर्षांपासून कृपाल यांना पदोन्नती मिळू शकलेली नव्हती.
११ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कॉलेजियमच्या बैठकीत सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, याअगोदर तब्बल चार वेळा कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सौरभ कृपाल यांच्या प्रस्तावित नियुक्ती त्यांच्या स्वत:च्या लैंगिक अभिरुचीमुळे वादात अडकली होती.
यावर मार्च २०२१ मध्ये भारताचे माजी मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासंदर्भात आपलं मत स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. कृपाल यांच्या लैंगिक अभिरुचीचं कारण पुढे करत केंद्रानं त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप व्यक्त केला होता.
सर्वप्रथम, २०१७ साली तत्कालीन कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या नेतृत्वात दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून सौरभ कृपाल यांना पदोन्नती देत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानंही कॉलेजियमच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…