वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी


मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेसोबतच रोजगार निर्मितीवर भर, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा. अशा शहरांच्या निर्मितीसाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ' मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी' निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्याचे सूचित करीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगभरातून लोक मुंबईमध्ये विमाने आणत असतात. त्यामुळे पार्किंगची चांगली सुविधा या विमानतळावर उपलब्ध असायला पाहिजे. यासोबतच विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर असावी. विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुक ' कनेक्टिव्हिटी' ची कामे वेळेत पूर्ण करावीत.


नैना प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी. या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणारे रस्त्यांची रुंदी भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन निर्धारित करण्यात यावी. भविष्यात सुरू होणाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. यापुढे पायाभूत सोयी सुविधा निर्मितीच्या कामांबाबत निविदेमध्येच कालावधीची सक्ती करण्यात यावी. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना कुठलेही काम जास्त कालावधीसाठी रेंगाळणे योग्य नाही. त्यामुळे कामांचा कालावधी हा निश्चित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.


मेट्रो स्टेशन पासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याबाबत नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. घरकुल आणि गृहनिर्माणच्या बाबतीत कामे दर्जेदार करण्यात यावी. याबाबतही कालावधीची मर्यादा ठेवावी. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत कार्यवाही करावी. नवी मुंबई परिसरात क्रीडा सुविधांचे कामे सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये क्रीडा सुविधांचा चांगला विकास होत आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


सह्याद्री अतिथिगृह येथे सिडकोच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अप्पर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Traffic Congestion : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी,तीन प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या

Government Decision : आजपासून 'ऑर्केस्ट्रा बार'चे परवाने बंद!

गृह विभागाचा निर्णय; जुन्या परवान्यांचे नूतनीकरणही थांबवले मुंबई : हॉटेल, उपाहारगृहे आणि बारमधील अश्लील

Water Cut Mumbai : येत्या मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक पाणीकपात

आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या

Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार ४२५ कोटींचा विकास आराखडा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबई :