Friday, March 6, 2026

राज्यात ११९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ११९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ११९३ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या आता ६६ लाख १४ हजार १५८ इतकी झाली आहे. यातले फक्त १५ हजार ११९ अॅक्टिव्ह रुग्ण असल्यामुळे साथीचे स्वरुप हळूहळू कमी होत आहे.

नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे.

दिवसभरात एकूण १५१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६४ लाख ५५ हजार १०० इतका झाला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट देखील ९७.६ टक्क्यांवर गेला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १,४०, ३१३ इतका झाला आहे.

Comments
Add Comment