वैभववाडी (प्रतिनिधी) : कोवीड काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीत ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी भूमिका आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या दोन डॉक्टरांचा गेले पाच महिने पगार झाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अखेर या दोन्ही कोरोना योद्ध्यांनी राजीनामा दिला आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे प्रमुख पद गेली अनेक महीने रिक्त आहे. वैद्यकीय अधिक्षक नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णता बोजवारा उडाला आहे.
११ महिन्यांच्या करारावर तीन डॉक्टर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सांभाळत आहेत, मात्र आरोग्य यंत्रणेने या तिन्ही डॉक्टरांना पाच महीने उपाशी ठेवले आहे. मे महीन्यापासून डॉ. भानुप्रताप मलिक व डॉ. शिवानी बुटी हे दोन डॉक्टर कार्यरत होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. त्यांना मे महिन्याचा पगार देण्यात आला. त्यानंतर जूनपासून तब्बल पाच महिने पगारच दिला नाही.
या डॉक्टरांना पगार नसल्याने ते अडचणीत आले होते. घर चालवायचे कसे? घरच्यांकडून सारखे पैसे कसे मागायचे? अशा कात्रीत ते डॉक्टर सापडले होते. अखेर कंटाळून या दोन्ही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. कोरोना काळात ज्यांना कोविड योद्धा म्हणून संबोधित केले जात होते. त्या कोविड योद्ध्यांवरच अशी नामुष्की ओढवणे, हे दुर्दैव आहे. डॉ. धर्मे यांच्यावर आरोग्य यंत्रणेचा ताण पडत असल्याने ते ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…