कणकवली न.पं.ला वातानुकूलित शवपेटी

  49


नितेश राणे यांचा पाठपुरावा




कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर व सचिव विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कणकवली नगरपंचायतला ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गावकर व घरत यांचे आभार व्यक्त केले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही शवपेटी पुन्हा नगरपंचायत जवळ उपलब्ध राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.


नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शवपेटीची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शब्द दिला होता. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेट्या असल्याने अनेकदा नागरिकांना ताटकळत राहावे लागते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष आण्णा कोदे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण