कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण भागातील जनजीवन आता मूळ पदावर येऊ लागले आहे. पीककापणी, लाकडाच्या मोळी व रानभाज्या विक्री अशा कामांमध्ये आदिवासी पुन्हा रोजगार मिळवू लागला आहे.


गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. पण आता कोरोनाविषयक निर्बंध शिथिल झाले असून रेती, वीट, भाताच्या गिरण्या, आठवडे बाजार असे सारे काही सुरू झाल्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांच्या हातांना पुन्हा एकदा रोजगार मिळू लागला आहे. शाळादेखील सुरू झाल्या आहेत. परंतु, पालक व विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आजही वर्ग ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. उद्योगक्षेत्रही रुळावर आल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र सुखावले आहेत. समुद्रीकिनारी असलेल्या मच्छीमार गावातही सध्या आनंदाचे वातावरण असून मत्स्यधनही चांगल्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मच्छीबाजारसुद्धा चांगलाच तेजीत आला आहे.


शहरी भागांतही अनेक निर्बंध शिथिल झाले असून दुकाने, हॉटेल्स, वाडापावाच्या गाड्या, चहा व पान टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार आता टळली आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम