‘सावरकरांचे शाश्वत विचार कुणीच समाप्त करू शकत नाही’- देवेंद्र फडणवीस

मुंबई : “राष्ट्रभक्ती, देशभक्तीशी बांधिलकी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर देशाकरता मोठे आहेतच. पण मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारेही आहेत. अशा सावरकरांच्या विचारांवर चालत असताना देशात जे काही लोक बुद्धिभेद करत आहेत, अशा तथाकथिक बुद्धिवाद्यांना सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो असा मला विश्वास आहे. जो शाश्वत विचार सावरकरांनी मांडला आहे, तो कुणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, संस्कृतीला, मराठीला जे सावरकरांनी दिलं आहे, त्यासाठी मी सावरकरांसमोर नतमस्तक होतो”, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.


देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली आहे. भाजपाकडून मुंबईच्या गिरगावातल्या मराठी कट्टा या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांविषयीची आपली भूमिका मांडली आहे. तसेच, सावरकरांच्या महतीविषयी बोलताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एका कृतीचा दाखला देखील दिला आहे.

Comments
Add Comment

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी