सर्वसामान्य मुंबईकरही करू शकतील एसी लोकलने प्रवास

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना लोकलसेवा १५ ऑगस्टपासून काही अंशी सुरू करण्यात आली आहे. पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने इतरांनाही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात येते.


कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या काळात लोकलसेवा बंद करण्यात आली होती नंतर ती हळूहळू सुरू करण्यात आली. लोकलसेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. अशातच एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना आता एसी लोकलचा प्रवास सुकर होईल. प्रवाशांना तिकीट दरातील तफावत अदा करून या गाडीतून प्रवास करता येईल.


एसी लोकलमधील प्रवासीसंख्या वाढविण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यानुसार विविध प्रस्तावांवर विचार सुरू आहे. जेव्हा प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात होईल, तेव्हा या तिकीटदराबाबत विचार करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.



सर्वच गाड्या होणार वातानुकूलित?


मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. सर्व उपनगरी गाड्या लोकल वातानुकूलित म्हणजे एसी करण्याचाही रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.


मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जात आहे.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल