‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात

Share

पुणे (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळच्या तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र व भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. बोरघाट (दस्तुरी) महामार्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पो चालकाचे येथील तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो भाजीची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून जोरात आदळला. त्या धक्क्याने भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. टेम्पोच्या धडकेने ही कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून आदळली तर तो कोंबड्याचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला. तसेच दुसरी एक हुंदाई कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणाऱ्या ट्रेलर आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मध्ये सापडून चिरडली गेल्याने हुंदाई कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

अंगावर काटा आणणारे दृश्य

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले व मृतदेहही बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

26 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

27 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

38 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

47 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

50 minutes ago