कोरोनाच्या कठीण काळानंतर अर्थव्यवस्थेची उभारी : मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोरोना काळ, त्या काळातील निर्बंध, टाळेबंदी याचा फटका जगभरात सर्वत्र बसला होता. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला होता. करोनावर लस विकसित झाल्याने, करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने जगभरातील अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा सुरु झालं असलं तरी अनेक देश अजूनही धक्क्यातून पुरेसे सावरले नाहीत. असं असतांना भारताची अर्थव्यवस्थेची जोरदार आगेकुच सुरु असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


गुजरातमधील सुरत येथील कार्यक्रमात आभासी पद्धतीद्वारे उपस्थित राहत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानिमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. स्टार्टअप इंडियाचे यश आपल्या सर्वांसमोर आहे. आज भारतातील स्टार्टअप संपुर्ण जगात नाव कमवत आहेत. करोनाच्या कठीण काळानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने जेवढ्या वेगाने उभारी घेतली आहे की संपुर्ण जग आशेने भारताकडे बघत आहे. एका जागतिक संस्थेने पण असं म्हंटलं आहे की पुन्हा एकदा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे “, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१