'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान'

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निर्लज्ज नागरिकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी सांगलीत केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.


संपूर्ण जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आपला देश आहे. आपला क्रमांक एक आहे... कशात? निर्लज्जापणात. जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, गुलामी दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणाचा वाटत नाही, लाज वाटत नाही अशा १२३ कोटी लोकांचा देश जगात आहे. प्रदीर्घ काळ, परक्यांचा मार खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.


दुर्गामाता दौडीला परवानगी नाकारल्याने संभाजी भिडे हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले. यावरुन संभाजी भिडे म्हणाले, दारूची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते हे बेशरम, नालायक आहेत. प्रभू रामचंद्र विवेक हरवून ज्याप्रमाणे सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे.


दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी नाकारली आणि हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यावर २१व्या दिवशी महसूल वाढावा म्हणून राज्यातील सर्व दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देतात. हे बेशरम आणि नालायक राज्यकर्ते आहेत, असेही संभाजी भिडेंनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये