राज्याने ओलांडला ९ कोटी लसीकरणाचा टप्पा

  43

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. राज्याने आतापर्यंत ९ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.


राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले' अभियानामध्ये सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना एकत्रित करून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.



राज्यात २३८४ नवे रुग्ण


गुरुवारी राज्यात २३८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५ लाख ८६ हजार २८० वर पोहोचला आहे, तर गुरुवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ३९ हजार ७०५ वर पोहोचला आहे.


गुरुवारी २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा ६४ लाख १३ हजार ४१८ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के, तर मृत्यूदर २.१२ टक्के आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर २ ते ३ हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी १४ ऑक्टोबरला २ हजार ३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३५ मृत्यूंची नोंद झाली असून २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के तर मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे

Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता