पालिकेच्या सभा प्रत्यक्ष घेण्यापासून सेनेचा पळ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सभा प्रत्यक्षपणे घ्या ही मागणी भाजप सातत्याने करत आहे, असे असताना सत्ताधारी शिवसेना मात्र प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.


मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवासाला ही मुभा दिल्यानंतर पालिकेतील सभा प्रत्यक्ष का नको म्हणून भाजपने सातत्याने सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली नाही. यापूर्वी देखील याच मागणीसाठी भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे आंदोलन केले होते. असे असताना देखील भाजप सदस्यांना बुधवारी बैठकीत बसू दिले नाही.


दरम्यान या मागणीसाठी भाजपने उच्च न्यायालयात देखील याचिका केली होती. यात सभा प्रत्यक्ष घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सत्ताधारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.


कोरोना काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यास सुरुवात झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करता येत नसून विरोधकांना ऐकू देखील येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठका घ्या ही मागणी भाजपने केली होती. तर स्थायी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.


पालिकेतील सभा प्रत्यक्ष घेतल्या जाव्यात, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी सरकारला तसे पत्र देखील लिहिले आहे. मात्र सरकारने तूर्त तरी पालिकेच्या सभा प्रत्यक्ष न घेता व्हिसीद्वारे घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसारच सभा घेण्यात येत आहे. - यशवंत जाधव, स्थायी समिती

Comments
Add Comment

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून

Reay Road Railway Bridge : पूल विभागाचे अधिकारी गैरहजर, रे रोड रेल्वेवरील पुलाच्या वाढीव कामाचा प्रस्ताव केला दप्तरी दाखल

स्थायी समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक पुलांची तसेच उड्डाणपुलांची कामे

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी