मुंबईत दिवसभरात ४१० नवे कोरोनाबाधित

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सोमवारी दिवसभरात ४१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात आहे. तसेच तिसरी लाट येऊच नये यासाठी उपाययोजनाही केल्या जात आहे. लसीकरणालाही वेग दिला आहे. असे असताना पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. मुंबईत निर्बंधांमध्ये आणलेल्या शिथिलतेमुळे लोक बिनधास्त असल्याचे दिसत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी करणे, मास्क न वापरणे असे प्रकार समोर येत आहे.


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका व्यक्तीकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला असून, मुंबईत कोरोनाची आर व्हॅल्यू पुन्हा एकदा १ हून अधिक झाली आहे. आर व्हॅल्यू अर्थात रिप्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ कोरोनाचा धोका वाढवत आहे. ज्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. तर सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा गर्दी होत आहे.
लोकलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता