श्रीलंका संघात चार बदल



कोलंबो (वृत्तसंस्था) : आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या श्रीलंका संघात चार बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त असलेल्या लहिरू मदुशंका आणि नुवान प्रदीप यांच्यासोबत प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदु मेंडिस यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांना संधी मिळाली आहे.


विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकन निवड समितीने सोमवारी १५ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी जाहीर केली. अकिला हा श्रीलंकेच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय संघात खेळला आहे. गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या कामगिरीवर फरक पडला आहे. मागील नऊ टी-ट्वेन्टी सामन्यात त्याने फक्त ६ विकेट बाद केले आहेत. मात्र त्याचा अनुभव पाहता त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, कामिंदु मेंडिसला संघात स्थान मिळालेलं नाही. त्याच्याऐवजी पथुम निसंकाला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज मदुशंका आणि प्रदीप यांचा दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे.


टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका संघाला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. १८ ऑक्टोबरला नामिबिया संघाविरुद्ध पात्रता फेरीच्या पहिला सामना होणार आहे. त्यानंतर २० आणि २२ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे आयर्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सामने होतील.


श्रीलंका संघ : दसून शानका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुशल परेरा, दिनेश चंडिमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्ष, चरिथ असलंका, वहिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ना, दुश्मांता चमीरा, महीश थीक्षना, लहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजय, पथुम निसंका

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात