नवरात्र

कोल्हापूरची अंबाबाई

कोल्हापुरात वसलेली श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन आहे. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे केले. सतराव्या शतकांनतर हे मंदिर अधिक प्रसिद्ध झाले.

 

आदिशक्ती तुळजाभवानी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आदिशक्ती तुळजाभवानीला अग्रमान आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे प्रमुख पीठ मानले जाते. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.

 

माहूरची रेणुकामाता

सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे माहूर हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे. देव, सिद्ध, ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती.

 

 

महिषासुरमर्दिनी सप्तश्रंगी

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड.

मुंबईची मुंबादेवी

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला येथील मुंबादेवीमुळे ‘मुंबई’ हे नाव प्राप्त झाले आहे. मुंबादेवीचे सर्वात जुने मंदिर जव्हेरी बाजारमध्ये आहे. कोळी लोकांची ही देवी आहे. या देवीचे मंदिर साडेचारशे वर्षापूर्वी सध्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असलेल्या जागी एका कुटी स्वरूपात होते. १७३७ साली इंग्रजांनी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी या देवीची भुलेश्वर येथे पुनस्थापना केली.

विरारची जिवदानी

विरार रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जिवदानी मातेचे वास्तव्य आहे. मातेच्या वास्तव्याची आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे, पूर्वी या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतक-याच्या शेतात एक अनोळखी गाय दररोज चरण्यासाठी येत असे.

अंबेजोगाईची योगेश्वरी

अंबेजोगाई मराठवाड्यातले एक प्राचीन नगर. या शहराच्या मधोमध जयंती नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरीमातेचे भव्य मंदिर आहे. मुख्य मंदिर उत्तराभिमुख असून, पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख महाद्वारासमोर दोन भव्य दीपमाळा आहेत. हे मंदिर हेमाडपंती असून, उंच शिखर व सभोवती चार मध्यम शिखरे आहेत. या शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

पुण्याची चतु:शृंगी

पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.

कार्ल्याची एकवीरा

एकवीरादेवीचे स्थान लोणावळा रेल्वे स्थानकापासून १२ किमी व मळवली रेल्वे स्थानकापासून सात किमी अंतरावर आहे. कार्ला लेण्यांच्या महाद्वारापाशी उत्तरेकडे तोंड करून देवी विराजमान झालेली आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तिदेवता आहे. देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे.