नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने (N. Jagadishan) लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ऐतिहासिक खेळी केली आहे. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध २७७ धावा जमवल्या. वनडे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

नारायण जगदीशनने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची इनिंग खेळली होती. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या आधी सरेचा फलंदाज एलिस्टर ब्राऊनने २००२ मध्ये २६ धावा केल्या होत्या. जगदीशनने या दोघांचे रेकॉर्ड तोडले.

जगदीशनच्या खेळीने सोमवारी बंगळुरूमध्ये तामिळनाडूला ५०६/२ धावा करता आल्या. वनडेमध्ये पहिल्यांदाच ५०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. यापूर्वी इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध ४९८ धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात जगदीशन दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. गेल्या ५ डावांत त्याने सलग ५ शतके झळकावली आहेत. या फलंदाजाने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here