Thursday, May 2, 2024
Homeदेशदिल्ली दंगल प्रकरणी मोहम्मद जुबेरला अटक

दिल्ली दंगल प्रकरणी मोहम्मद जुबेरला अटक

नवी दिल्ली (हिं.स.) : देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी सोमवारी ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांला अटक केली आहे. जुबैरला भादंविचे कलम १५३/२९५ अन्वये अटक करण्यात आली आहे. मोहम्मद जुबेरला वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैर पसरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे.

मोहम्मद जुबैर याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. स्वतःला तथ्य तपासणारा म्हणवून घेणाऱ्या मोहम्मद जुबेरच्या समर्थनार्थ डाव्या विचारांचे लोक पुढे आले आहेत. कविता कृष्णन आणि प्रतीक सिन्हा यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. यासंदर्भात प्रतीक सिन्हा म्हणाले की, “जुबेरला सोमवारी (२७ जून २०२२) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. हे २०२२ च्या एका प्रकरणाच्या तपासाबाबत होते.

मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना अटकेतून दिलासा दिला आहे. परंतु, आज संध्याकाळी ६:४५ वाजता त्याला आणखी एका प्रकरणात उचलण्यात आले ज्यासाठी कोणतीही आगाऊ सूचना देण्यात आली नव्हती. आम्ही वारंवार विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत दिली जात नसल्याचा आरोप सिन्हा यांनी केला आहे. पोलिसांनी मोहम्मद जुबेरला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची तयारी सुरू केली असून, त्यादरम्यान त्याच्याकडे चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्याला तुरुंगात पाठवण्याची कारवाईही होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -