Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाBCCI : ऋषिकेश कानिटकर भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक

BCCI : ऋषिकेश कानिटकर भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत घोषणा केली आहे.

९ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी ऋषिकेश कानिटकर संघात सामील होतील, असे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवण्यात आले आहे. ते बंगळुरूमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करणार आहेत.

या नियुक्तीनंतर कानिटकर म्हणाले की, राष्ट्रीय महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला या संघात प्रचंड क्षमता दिसत आहे. आमच्याकडे युवा आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. काही मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि संघासह फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ते रोमांचक असणार आहे.

त्याचवेळी महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पवार म्हणाले की, ‘वरिष्ठ महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा अनुभव चांगला आहे. गेल्या काही वर्षांत मी देशातील काही दिग्गज आणि नवोदित प्रतिभांवान खेळांडूसोबत काम केले आहे. एनसीएमधील माझ्या नवीन भूमिकेतील माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे मी उत्सुक आहे. बेंच स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -