Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली

Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा घेतला समाचार

मुंबई : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल एका भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मास्टर नव्हे तर ‘मस्टर मंत्री’ असा उल्लेख केला. भाजपामध्ये आता राम उरला नाही, केवळ आयाराम आहेत, असंही ते म्हणाले. यावर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवेंद्रजींच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं’, असा टोला लगावला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली, असा आरोप उद्धव ठाकरेंवर केला आहे.

ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला, तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली.

बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -