Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीसलग तिसऱ्यांदा 'शी जिनपिंग' चीनचे राष्ट्राध्यक्ष

सलग तिसऱ्यांदा ‘शी जिनपिंग’ चीनचे राष्ट्राध्यक्ष

बीजिंग : शी जिनपिंग यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चा कमांडर देखील असतो.

जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. चीनमध्ये १९८० नंतर सर्वोच्च पदावर १० वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला.

चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अध्यक्षाला तिसऱ्यांदा या पदावर कायम राहता येणार आहे. यावेळी २०५ सदस्यांची पक्षाची मध्यवर्ती समितीही जाहीर झाली. पक्षानं या समितीतून प्रधानमंत्री ली केकियांग, उपप्रधानमंत्री हान झेंग यांच्यासह इतर दोघांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याना सरकारमध्ये महत्त्वाचे पद यापुढं भुषवता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -