Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीकोल्हापूरात कारच्या चाकाखाली १० फूट फरफटत गेला, तरीही वाचला!

कोल्हापूरात कारच्या चाकाखाली १० फूट फरफटत गेला, तरीही वाचला!

कोल्हापूर : शिरोली येथे अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. प्रकाशाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे तब्बल २० ते २५ गाड्या स्लीप झाल्याचा भयंकर प्रसंग पुणे बंगळूर महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलावर घडला. यामध्ये एक दुचाकीवर स्लीप होऊन घसरल्यानंतर थेट कारच्या चाकाखाली जाऊन तब्बल १० फुट फरफटत गेला. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला.

शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भयंकर प्रकार घडला. गाडीखाली फरफटत गेल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. वाहनांच्या उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यामुळे २० ते २५ वाहने स्लीप झाली. या दरम्यान, एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने तो १० फुटांपर्यंत फरफटत गेला.

पावसाचा कहर सुरु असल्याने नदी काठावरच प्रकाशाकडे आकर्षित होणारे कीडे जमा होत असल्याने ते सरळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावर मोठ्या संख्येने आले. त्यामुळे वाहनधारक गोंधळून गेल्याने स्लीप होऊन महामार्गावर कोसळले. यामुळे शिरोली पुलावर प्रचंड प्रमाणात हे किडे आल्याने वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -