Monday, May 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023: आजपासून सुरू होणार विश्वचषकाचे वॉर्म अप सामने

World Cup 2023: आजपासून सुरू होणार विश्वचषकाचे वॉर्म अप सामने

नवी दिल्ली: ५ ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे(World Cup 2023) वॉर्म अप सामन्यांना(warm up matches) आजपासून सुरूवता होत आहे. पहिला वॉर्मअप सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे.

पहिल्या दिवशी एकूण तीन वॉर्म अप सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरूअनंत पुरम येथे खेळवला जाणार आहे. तिसरा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. तर टीम इंडिया आपला पहिला वॉर्म अप सामना ३० सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

इंग्लंड आणि नेदरलँडशी भिडणार भारत

वॉर्म अप सामन्यात भारताचा सामना इंग्लंड आणि नेदरलँडशी होणार आहे. भारताचा पहिला सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. यानंतर संघाचा दुसरा सामना ३ ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध तिरूअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी २ वाजता सुरू होतील.

दोन-दोन वॉर्म अप सामने खेळणार सर्व संघ

वर्ल्डकपच्या आधी सर्व १० संघ २-२ वॉर्मअप सामने खेळतील. २९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वॉर्म अप सामने ३ ऑक्टोबरपर्यंत खेळवले जातील. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी ३-३ सामने होतील. वॉर्म अप सामने बारसापारा क्रिकेट स्टेडियम(गुवाहाटी), ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम(तिरूअनंतपुरम)आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम(हैदराबाद) या ठिकाणी होतील.

भारताने शेवटच्या क्षणी केला हा बदल

भारतीय संघाने वॉर्म अप सामन्यांच्या सुरूवातीच्या एक दिवस आधी आपल्या संघात शेवटचा बदल केला आहे. संघात स्टार स्पिनर आर अश्विनला संधी देण्यात आली आहे. त्याला अक्षऱ पटेलच्या जागी स्थान देण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -