Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023: भारताच्या वर्ल्डकप संघात अश्विनची एंट्री, बीसीसीआयने केली घोषणा

World Cup 2023: भारताच्या वर्ल्डकप संघात अश्विनची एंट्री, बीसीसीआयने केली घोषणा

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला(R ashwin) आगमी एकदिवसीय विश्वचषक २०२३साठी(one day world cup 2023) भारतीय संघात(indian team)wor स्थान मिळाले आहे. त्याला दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी १५ सदस्यी संघात संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी ही घोषणा केली.

अक्षरचे स्वप्न भंगले

३७ वर्षीय अश्विनला दुखापतग्रस्त अक्षऱ पटेलच्या स्थानी निवडण्यात आले आहे. अक्षऱ अद्याप आपल्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्याला १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्धच्या आशिया चषकादरम्यान दुखापत झाली होती. यासोबतच अक्षर पटेलचे एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचे स्वप्नही भंगले. अश्विन आधीच संघासोबत गुवाहाटीला गेला आहे येथे ३० सप्टेंबरला सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळतील.

ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये केली कमाल

अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलत दमदार कामगिरी केली. त्याने इंदौर मध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३ विकेट मिळवल्या तर मोहालीमध्येही त्याने एक विकेट मिळवला होता. या पद्धतीने त्याने मालिकेतील २ सामने खेळताना ४ विकेट मिळवल्या होत्या.

१२ वर्षांनी मोठी संधी

भारतीय संघाकड १२ वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी चालून आली आहे. टीम इंडियाने २०११मध्ये आपल्या यजमानपदात एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यावेळेसही ही स्पर्धा भारतात रंगत आहे. रोहित शर्मा आयसीसीच्या या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -