Monday, May 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: नेदरलँड्सने रचला इतिहास, द. आफ्रिकेवर ३८ धावांनी विजय

World cup 2023: नेदरलँड्सने रचला इतिहास, द. आफ्रिकेवर ३८ धावांनी विजय

धरमशाला: क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कधी कधी बलाढ्य वाटणारा संघ एखाद्या दुबळ्या संघासमोर कमकुवत ठरतो. असेच काहीसे आजच्या धरमशाला येथील नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पाहायला मिळाले.

विश्वचषकात आज दुसऱ्यांदा धक्कादायक निकालाची नोंद झाली. सोमवारी अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघादरम्यानच्या सामन्यात इंग्लंडचा धक्कादायक पराभव झाला. तर आजच्या सामन्यात दुबळ्या नेदरलँड्सने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.

विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला नेदरलँड्सने रोखले. नेदरलँड्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २४५ इतकी धावसंख्या साकारली होती. नेदरलँड्च्या कर्णधाराने सातव्या स्थानावर नाबाद ७८ धावांची खेळी केली. यामुळे नेदरलँड्सला अडीचशे धावांच्या नजीक पोहोचता आले.

आपल्या संघातील फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना सातव्या स्थानावर खेळण्यासाठी आलेला नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्डने नाबाद ७८ धावांची चिवट खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सने ८२ धावांवर आपले ५ गडी गमावले होते. तेव्हा असे वाटत होते की हा संघ दीडशे धावांचा स्कोर तरी करतो की नाही. मात्र स्कॉट एडवर्ड्स आणि रॉल्फ वान डर मर्व यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचत डावच पलटला.

दुसरीकडे आफ्रिकेच्या संघाला ५० षटकांत अवघ्या २४५ धावाही साकारता आल्या नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ २०७ धावांवर बाद झाला. आफ्रिकेच्या डेविड मिलरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी साकारली. बाकी फलंदाज चांगली खेळी करण्यात साफ अपयशी ठरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -