इंग्लंड वेस्ट इंडिजचा बदला घेईल?

Share

दुबई (वृत्तसंस्था) : यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पहिल्या दुहेरी सामन्यांतील दुसऱ्या लढतीत इंग्लंडची गाठ गतविजेता वेस्ट इंडिजशी पडेल. पाच वर्षांपूर्वीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने होते. त्यावेळच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न इंग्लिश संघ करेल.

वेस्ट इंडिजने वनडे वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातही दोनदा जगज्जेतेपद मिळवले आहे. मागील तीन हंगामात दोन जेतेपदे आणि उपांत्य फेरी अशी त्यांची चमकदार कामगिरी राहिली आहे. इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकता आली नसली तरी २०१०मध्ये टी-ट्वेन्टी प्रकारातील वर्ल्डकप उंचावला. मागील हंगामात ते उपविजेते आहेत. इतिहास वेस्ट इंडिजच्या बाजूने असला तरी आयसीसी टी-ट्वेन्टी क्रमवारी पाहिल्यास इंग्लंड पहिल्या रँकिंगवर आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकारात कामगिरी खालावलेला वेस्ट इंडिज संघ नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. अफगाणिस्तानने त्यांच्यापेक्षा वरचे रँकिंग मिळवले आहे.

उभय संघांमधील मागील पाच लढतींचा निकाल पाहिल्यास इंग्लंडने ३-२ अशी निसटती आघाडी घेतली आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सनी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, मॉर्गनला अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. डॅविड मलान, जेसन रॉय, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअर्स्टो असे टी-ट्वेन्टी फॉरमॅटला अनुकूल फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मोईन अलीचा आयपीएलमधील फॉर्म त्यांना गोलंदाजीत महत्त्वपूर्ण ठरेल. त्याला ख्रिस वोक्स, मार्क वुड या वेगवान दुकलीसह फिरकीपटू अदिल रशीदकडून चांगली साथ अपेक्षित आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डकडे आयपीएलचा अनुभव आहे. ख्रिस गेल, आंद्रे फ्लेचर, इविन लेविस, शिमरॉन हेटमायरवर त्यांची फलंदाजीची मदार आहे. आंद्रे रसेल, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श, असे ताज्या दमाचे गोलंदाज आहेत. मात्र, कॅप्टन पोलार्डसह ड्वायेन ब्राव्हो, रोस्टन चेस हे अष्टपैलू त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतात.

वेस्ट इंडिजने सर्वात जास्त काळ मिरवले जेतेपद

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक दोन जेतेपदे पटकावलेला वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे. त्यांनी भारतीय उपखंडात झालेल्या २०१२ आणि २०१६ स्पर्धांत बाजी मारली होती. ही विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. मात्र, कोरोनामुळे २०१८मध्ये स्पर्धा झाली नाही. त्यामुळे गतविजेत्या विंडिजला तब्बल पाच वर्षे जेतेपद मिरवता आले आहे. दोन वर्ल्डकपमधील सर्वात कमी कालावधी २००९ आणि २०१०मधील आहे. त्या काळात जगज्जेता पाकिस्तान जेमतेम वर्षभर चॅम्पियन राहिला.

आजचे सामने

ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका

वेळ : दु. ३.३० वा.

इंग्लंड वि. वेस्ट इंडिज

वेळ : सायं. ७.३० वा

Recent Posts

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! २० मे पर्यंत कोठडीत वाढ

सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam)…

23 mins ago

Uber Fake Fare Scam : सावधान! चालकांची हातचलाखी; उबरने दिला सतर्कतेचा इशारा

'अशा' प्रकारे होतेय प्रवाशांची लूट मुंबई : देशभरात विविध प्रकारचे स्कॅम होत असतानाच आणखी एका…

48 mins ago

Baramati Loksabha : EVM वर कमळाचं फूल नाही तर मतदान कसं करायचं?

पुण्यातील मतदार आजोबा संतापले पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने…

54 mins ago

Chaitra Amavasya 2024 : चैत्र अमावस्येला आवर्जून करा ‘ही’ कामं, मिळेल पुण्यप्राप्ती!

जाणून घ्या तिथी, वेळ आणि महत्त्व मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला चैत्र…

3 hours ago

Utkarsha Rupwate : वंचितच्या शिर्डीमधील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक!

हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत…

3 hours ago