का केलं जात लाडक्या गणेशाचं विसर्जन?

Share

घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा काहींच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जात असतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येते. आपण जाणुन घेऊयात की आपल्या लाडक्या गणेशाचं विसर्जन का करण्यात येते.

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, गणेशजींनी सलग १० दिवस महाभारत लिहिले होते. एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते. हे ज्यावेळी व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेद व्यासजींनी त्यांना एका जलस्त्रोतावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले. त्यामुळे गणेशजींना मोठा आराम मिळाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. त्या दिवसापासून या तिथीला गणेशजींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

पाण्यात का केलं जात विसर्जन?                                                                                                ज्ञान, बुद्धीची देवता, आणि पाणी, हे देखील ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित असल्याचे मानले जाते, याचे कारण स्वतः गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात. पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेले असल्यामुळे, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली गणेशाची मूर्ती मूळ स्वरूपात पाच तत्वांमध्ये विरघळते आणि विलीन होते.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

6 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

7 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

8 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

9 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

10 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

10 hours ago