Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाKL Rahul: पूर्णपणे फिट नसतानाही संघात स्थान, राहुलवर इतकी मेहेरबानी का?

KL Rahul: पूर्णपणे फिट नसतानाही संघात स्थान, राहुलवर इतकी मेहेरबानी का?

मुंबई: आशिया कपसाठी (asia cup) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात भारताचा स्टार सलामीवीर केएल राहुललाही (kl rahul) संधी देण्यात आली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे राहुलची नुकतीच सर्जरी झाली होती. यानंतर तो सरळ आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.बीसीसीआयने(bcci) राहुलला दुखापतीनंतर कोणताच सामना न खेळवता संघात सामील केले आहे. निवड समितीने राहुलला विकेटकीपर फलंदाज म्हणून सामील केले. दरम्यान, राहुल अद्याप पूर्णपणे ठीक झालेला नाही. त्याला थोडा त्रास आहे.

राहुलबाबत अनेक सवाल

तो पूर्णपणे फिट नसतानाही राहुलला संघात स्थान दिल्याने अनेक सवाल केले जात आहेत. दरम्यान, संजू सॅमसनला डावलून राहुलला का संधी दिली गेली असाही सवाल चाहत्यांच्या मनात आहे. अखेर बीसीसीआय राहुलवर इतकी मेहेरबान का आहे? असाही सवाल केला जात आहे.

या प्रश्नाची उत्तरे पाहता बीसीसीआय आणि संघ मॅनेजमेंट गेल्या काही काळापासून राहुलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत आहे. राहुलच्या टेक्निकबाबत अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. अनेकदा राहुलकडे नेतृत्वही देण्यात आले.

तीनही फॉरमॅटमध्ये राहुलचे पदार्पण

राहुलने डिसेंबर २०१४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्टन कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सुरूवातीच्या ६ कसोटीत त्याने ३ शतके ठोकली.
राहुलने ११ जून २०१६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वनडेत पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात राहुलने नाबाद १०० धावांची खेळी केली.
राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासोबतच चौथ्या सामन्यात शतक ठोकले होते.

राहुलचे क्रिकेट करिअर

४७ कसोटी सामने – २६४२ धावा – ७ शतके
५४ वनडे सामने – १९८६ धावा – ५ शतके
७२ टी२० सामने – २२६५ धावा – २ शतके

यासाठी राहुलवर मेहेरबान बीसीसीआय

लोकेश राहुल सध्या ३१ वर्षांचा आहे. अशाच रोहितनंतर राहुलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. खासकरून कसोटीत हेच चित्र दिसते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -