Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange: जरांगेच्या मागणीनुसार कोणा-कोणाला मिळणार कुणबी आरक्षण...?

Manoj Jarange: जरांगेच्या मागणीनुसार कोणा-कोणाला मिळणार कुणबी आरक्षण…?

 

मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये ‘सगेसोयरे’या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्यागणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

सरकारने जारी केलेल्या जीआमध्ये सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. जीआर नुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगेसोयरे असतील. तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये (GR) करण्यात आला आहे.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील नातेवाईक, असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

तसेच कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -