Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीहवामानबदलाची वाढती तीव्रता कशामुळे?

हवामानबदलाची वाढती तीव्रता कशामुळे?

रूपाली केळस्कर

कुठे कोरडे तलाव, कुठे अतिवृष्टी, कुठे वनांना आगी… जगभर उष्णतेत वाढ. लोकांचं जगणं अवघड झालेलं. कुठे आपत्ती निर्माण होत असल्याचा इशारा. जगात सर्वत्र दिसणारं हे चित्र केवळ एकाच कारणामुळे अनुभवायला मिळत आहे आणि ते म्हणजे हवामानबदल. हवामानबदलाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जगाला आणखी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. ताज्या संदर्भांच्या निमित्ताने घेतलेला वेध.

इराकमधले तलाव कोरडे पडले आहेत. थंड प्रदेश अशी ख्याती असलेला युरोप अभूतपूर्व उष्णतेने होरपळत आहे. अनेक देश प्रचंड उष्णतेच्या लाटेत सापडले आहेत. संपूर्ण युरोपला कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत असल्याने पश्चिम फ्रान्समध्ये मोठी आपत्ती निर्माण होणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये उष्मा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे, तर स्पेन, पोर्तुगाल आणि ग्रीसमध्ये आकाशातून जणू आगीचा वर्षाव झाला. जंगलात लागलेल्या आगीमुळे या देशांतून हजारो लोकांना आपली घरं सोडावी लागली. भारत आणि पाकिस्तानच्या काही भागातही वाईट परिस्थिती आहे. इथे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या उकाड्याने लोकांचं जगणं कठीण झालं असून अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे पोहोचलं होतं. इथिओपिया आणि सोमालियामध्ये उष्णतेमुळे अनेक दशकांमधला सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. क्युबा आणि नेदरलँड्सने पुराचा सामना करताना भारतासमोर काय उदाहरण ठेवलं? भारतात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, उष्णतेला कसं सामोरं जावं, अशा प्रश्नांची उत्तरंही बदलत्या जागतिक हवामानात दडली आहेत. आपल्या डोळ्यांना दिसणारे बदल हे मानवामुळे होणाऱ्या हवामानबदलाचे परिणाम आहेत. मुसळधार पावसाने यंदा बांगलादेशमध्ये पूर आला. या घटनांमागील एक समान कारण शास्त्रज्ञ सांगतात. त्याबाबत त्यांच्यात सहमती आहे. कोणत्याही नैसर्गिक घटनेत हवामानबदल किती भूमिका बजावतात, हे ते उलगडून दाखवतात. विज्ञानाशी संबंधित क्षेत्र अशा उत्तरासाठी उपयुक्त ठरतं. त्याला ‘एक्स्ट्रीम इव्हेंट अॅट्रिब्युशन’ म्हणतात. ही विज्ञानाची नवी शाखा आहे.

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधले पर्यावरण भूगोल विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. थॉमस स्मिथ म्हणतात, ‘एक्स्ट्रीम इव्हेंट अॅट्रिब्युशन’ ही विज्ञानाची तुलनेने नवी शाखा असली तरी तिचा विस्तार वेगाने होत आहे. डॉ. स्मिथ म्हणतात की, २०१८ मध्ये प्रथमच (फ्लोरेन्स चक्रीवादळाच्या वेळी) हवामानातल्या बदलांशी संबंधित घटनांच्या कारणांचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. तेव्हापासून अनेक अभ्यास करण्यात आले. क्रियाकलापांमुळे होणारे बदल हे हवामानातल्या तीव्र बदलांमुळे होतात. जंगलातली आग, वादळ, उष्णतेची लाट, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या घटनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न ताज्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’च्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने अलीकडेच प्रकाशित केलेला एक अहवाल हवामानासंदर्भातल्या काही घटना आणि हवामानबदल यांच्यातला संबंध समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे हवामानातल्या घटना कशा बदलत आहेत, यावर त्यात भाष्य आहे. अमेरिकेतले शास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो आणि त्यांच्या सहकार्यांनी हवामानबदलाची तुलना अशा व्यक्तीशी केली आहे, जी भरपूर सिगारेट ओढते. जिची फुप्फुसं हळूहळू कॅन्सरची शिकार बनण्याच्या दिशेने जात आहेत. कर्करोगाचं खरं कारण धूम्रपान आहे, हे डॉक्टरांना सांगता येत नसलं, तरी सिगारेटमुळे ही लक्षणं वाढतात, हे ते खात्रीने सांगतात.

हवामानातल्या कोणत्याही बदलासाठी केवळ हवामानबदल जबाबदार असू शकत नाही, कारण हवामानाशी संबंधित सर्व घटनांना अनेक कारणं असू शकतात; परंतु ग्लोबल वॉर्मिंग अशा घटनांच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतं. अशा घटनांचा माणसांवर, मालमत्तांवर आणि निसर्गावर काय परिणाम होतो, याचाही अंदाज लावता येतो. नजीकच्या भविष्यात भारत ग्रीन हायड्रोजनचे केंद्र बनेल. या पद्धतीत संगणकाचं मॉडेल वापरलं जातं. दोन संगणकांमध्ये दोन परिदृश्यं दर्शवली आहेत. पहिला संगणक विशिष्ट दिवसाचे हवामान दर्शवतो. त्यात मानवी क्रियाकलापांमुळे होणारे हवामानबदल समाविष्ट आहेत. याचा अर्थ असा की, हवामान ‘मॉडेल सिम्युलेशन’चा वापर सध्याच्या हवामानातले अनेक ऋतू समजून घेण्यासाठी, समान परिस्थितीचे परिणाम पुन्हा पुन्हा समजून घेण्यासाठी केला जातो. दुसऱ्या प्रयोगात हरितगृह उत्सर्जनाचा परिणाम दूर केला जातो. त्याच वेळी औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या हवामानाप्रमाणेच हवामानाचं (समान परिस्थिती) प्रारूप तयार केलं जातं. नंतर दोन्ही प्रकरणांमध्ये शास्त्रज्ञ हवामानबदलाच्या मोठ्या घटनांची नोंद घेतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये किती वेळा एवढा मोठा बदल झाला याची नोंद ते घेतात. हवामानाशी संबंधित घटना तीनदा घडली, तर मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बदल घडण्याची शक्यता तिप्पट होऊ शकते. वातावरणातले बदल हे उष्णतेचं कारण आहे.

डॉ. ओट्टो म्हणतात, आम्ही सैबेरियामध्ये २०२१ मध्ये उष्णतेची लाट पाहिली तेव्हा आढळलं की, ती हवामानबदलामुळे झाली आहे. हवामानबदल झाला नसता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आम्ही २०१९ मध्ये युरोपीय देशांमध्ये आलेल्या काही उष्णतेच्या लाटांचं विश्लेषण केलं. त्यावेळी तापमानात पाचपट वाढ झाल्याचं आढळलं. ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’मधल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पावसाचा मुद्दा अधिक स्पष्ट आहे. कारण उबदार हवा अधिक आर्द्रता निर्माण करते. तथापि, चक्रीवादळ, दुष्काळ, पूर आणि जंगलातली आग यासारख्या घटनांमध्ये हवामानबदल किती भूमिका बजावतात हा प्रश्न उरतो. यामध्ये कमी पाऊस, उच्च तापमान, हवामान आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यातला संबंध महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक कारणांमुळे पूरदेखील येऊ शकतो. अर्थात याला अतिवृष्टी कारणीभूत असली तरी मानवी क्रियाकलापांचाही हात आहे. दर वर्षी येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या कमी झाली नसली, तरी हवामानबदलामुळे त्यांची तीव्रता नक्कीच वाढली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. समानता आणि न्यायासाठी हवामानबदल हा सर्वात मोठा धोका आहे. हवामानबदल हा जागतिक समानता आणि न्यायासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. शास्त्रज्ञांच्या गटाचा अभ्यास हवामानबदल समजून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा त्यांचा विश्वास आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -