Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीपश्चिम रेल्वेने गाड्या वाढवल्या पण प्रवासी नाखूश!

पश्चिम रेल्वेने गाड्या वाढवल्या पण प्रवासी नाखूश!

गर्दीच्या वेळेत एकही लोकल नाही!

मुंबई : वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून ऐन उकाड्याच्या दिवसात मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास काहीसा सुखकर होण्यासाठी या मार्गावर १२ डब्याच्या आणखी ११ लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. उद्या, ५ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र खरी गर्दी ही सकाळी साडेसात ते साडेदहाच्या दरम्यान चर्चगेटकडे जाण्यासाठी असते. तर संध्याकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान बोरीवली-विरारच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये खूप गर्दी असते. या वेळेत एकही ट्रेन नसल्याने गर्दीतूनच प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे २५ लाख प्रवासी प्रवास करतात. उन्हाळ्यात या मार्गावरील लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळं प्रवाशांचा जीव मेटाकुटीस येत असतो. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानं लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्यानं सुरू होणाऱ्या लोकल गाड्यांपैकी जलद गाड्या तूर्त बोरिवली आणि वांद्रे स्थानकांवर थांबणार नाहीत. नव्या गाड्यांना सामावून घेण्यासाठी सध्याच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात येणार आहे. नव्या निर्णयामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १,३८३ वरून १,३९४ पर्यंत पोहचणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना यात्री अ‍ॅपच्या माध्यमातून लोकल गाड्याचं रिअल टाइम लोकेशन समजणार आहे. रेल्वेनं लाइव्ह लोकेशन ट्रक अ‍ॅप्लिकेशन तयार केलं आहे. प्रवाशांना बुधवारपासून त्याचा वापर करता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना ठराविक गाडी ठराविक वेळेत पकडता येणार आहे.

अप मार्गावरील नव्या लोकल

सकाळी ९.४० वाजता गोरेगाव – चर्चगेट (स्लो)

सकाळी १०.४२ वाजता विरार – दादर (जलद)

सकाळी ११.५० वाजता गोरेगाव – चर्चगेट (स्लो)

दुपारी १.५३ वाजता विरार – अंधेरी (जलद)

दुपारी २.४७ वाजता विरार – बोरिवली (जलद)

डाऊन मार्गावरील नव्या लोकल

सकाळी ८.३८ वाजता चर्चगेट – गोरेगाव (स्लो)

सकाळी १०.५१ वाजता चर्चगेट – गोरेगाव (स्लो)

दुपारी १२.०६ वाजता दादर – विरार (जलद)

दुपारी २.०० वाजता अंधेरी – विरार (जलद)

दुपारी ३.२३ वाजता बोरिवली – विरार (जलद)

रात्री ९.५५ वाजता चर्चगेट – वांद्रे (स्लो)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -