Saturday, May 18, 2024
Homeराशिभविष्यWeekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ मे २०२४

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ मे २०२४

सन्मानाचे स्थान मिळेल

मेष : या सप्ताहात अनुकूलता वाढत जात असल्याने, भरपूर आनंदाचे क्षण उपभोगावयास मिळणार आहेत. आपल्या जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि सहयोग मिळणार आहे. वैवाहिक आयुष्य आनंदाचे असणार आहे. कुटुंबामध्ये एकता आणि सामंजस्य राहणार आहे. प्रेमी-प्रेमिकासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम आहे. कलाकार खेळाडू यांना नवीन संधी येणार आहे. त्यामध्ये उत्तम यश प्राप्त होणार आहे. आपल्या सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीमध्ये जास्त लक्ष देऊन काम करावे.

संधी उपलब्ध होतील

वृषभ : व्यापार-व्यवसायामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जातकांसाठी अनुकूल कालावधी आहे. सदरच्या कालावधीमध्ये बरेच अनुकूल बदल घडतील. कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. तरुण-तरुणींना आपला जीवनसाथी निवडण्याच्या संधी उपलब्ध होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरण्याची शक्यता. व्यवसायामध्ये केलेले बदल व्यवसायासाठी पोषक ठरून, त्याचा फायदा होईल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणासाठी अनुकूल ग्रहमान असणार आहे. जे जातक नोकरी करत आहे, त्यांना नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही नवीन बदल घडणार आहेत. ते आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. आपल्याला मान-सन्मान मिळू शकतो.

कामाचे श्रेय मिळणार

मिथुन : शुभ ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी चांगले परिणाम देणार आहे. जे जातक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी खूपच उत्तम कालावधी आहे. थोड्या काळात जास्त नफा मिळू शकतो. कलाकार आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू शकते. आपण आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करणार आहात. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत. आपल्या कामाचे श्रेय आपल्यास मिळणार आहे. तुम्ही केलेल्या कार्याचे कौतुक होणार आहे. आपली स्वतःची ओळख निर्माण करणार आहात. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थी आपल्या मित्रमंडळींबरोबर मौज-मजेत वेळ घालवतील, मात्र कुसंगतीपासून अलिप्त राहिल्यास फायद्यात राहाल. प्रेमात यश संपादित करू शकाल.

धाडसी असणार आहात

कर्क : आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी असणार आहात. आपल्या करिअरमध्ये आपण नवीन प्रयत्न केले, तरी आपल्याला यश मिळणार आहे. या सप्ताहामध्ये आपले विरोधक नामोहरम होणार आहेत. या सप्ताहात आपला प्रवास होऊ शकतो. आपण व्यावसायिकदृष्ट्या चांगली प्रगती गाठणार आहात. आपल्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होणार आहेत. त्यातून तुम्हाला समृद्धी आणि लोकप्रियता, चांगले उत्पन्न व लाभ मिळतील. कुटुंबाकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. तसेच वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीसुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहेत. जुन्या परिचयाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते.

प्रश्न संपुष्टात येतील

सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय चांगले काम करणार आहात. त्यामुळे इतर व्यक्ती तुमचा आदर्श ठेवतील आणि आपला सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. ज्या व्यक्ती खेळाडू आहेत, त्यांना अतिशय चांगले यश मिळणार आहे. मैदानी खेळाचे प्रदर्शन अतिशय उत्तम होणार आहे. त्यांची खूप प्रशंसा होणार आहे. कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असणार आहे. नातेवाइकांकडून एखादी आनंदाची बातमी समजणार आहे. यश आणि कीर्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी येतील. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील.

नशीब तुमच्या बाजूने…

कन्या : हा सप्ताह संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. तुमच्या मार्गामध्ये कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे; परंतु खच्चीकरण होऊ देऊ नका. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. मात्र आपण गोंधळून न जाता शांतपणे, कोणत्याही लहान-मोठ्या स्वरूपाच्या कामामध्ये निर्णय घेणे आवश्यक आहे. आपल्या कार्यात चांगली प्रगती होईल. आपण नवीन मालमत्ता खरेदी करू शकता.

अनुकूल काळ

तूळ : अतिशय अनुकूल काळ. आपल्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे सोडवल्या जाणार आहे. शत्रूंचा बिमोड होणार आहे. समाजामध्ये तुमची पत वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही मिळवलेली कंत्राटे आणि करार यातून चांगला फायदा मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण नवीन व्यवहार करू शकता. नवीन कामे सुरू करू शकता. हे व्यवहार आपणास अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल.

जीवन सकारात्मक राहणार आहे                                               

वृश्चिक : स्वतःला व्यक्त करण्यासाठी, हा काळ अतिशय चांगला आहे. आपल्या सर्व क्षमतांचा चांगला वापर करण्यासाठी चांगला काळ आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगला बदल होण्याची शक्यता आहे. आपणास त्यातून आर्थिक फायदे चांगले मिळतील. वरिष्ठ व अधिकारी यांची कृपादृष्टी असणार आहे. आपला कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यांमुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता राहील.

धार्मिक कार्य

धनु : हा कालावधी आपणास मिश्र घटनांचा राहणार आहे. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींना आकर्षित करून घेऊ शकाल. त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी साहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी तुम्हाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र भावंडांमध्ये काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग येऊ शकतात. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही धार्मिक कार्य होऊ शकते. कौटुंबिक सुख मिळेल.

सहकार्य मिळणार आहे

मकर : तुमची कष्ट करायची तयारी असल्यामुळे, हा काळ तुम्हाला निश्चित चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे बदल आपणास फायदेशीर ठरतील. आपली निर्णयक्षमता अतिशय चांगली असणार आहे. तुमची आर्थिक आवक निश्चितच वाढणार आहे. शुभ ग्रहांमुळे आपल्या कष्टाचे चीज होणार आहे. शंकास्पद व्यवहार निश्चितच टाळा. आपल्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तीकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. घराचे, बांधकामाचे काही कामे असतील, तर ते या काळामध्ये करून घ्या. सामाजिक वर्तुळात आदर निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आनंददायी कालावधी.

संवाद चांगला राहील

कुंभ : हा सप्ताह आपणास मिश्र घटनांचा असणार आहे. तुमचा पैसा बरेच ठिकाणी अडकल्यामुळे रोख रकमेचीची कमतरता भासू शकते. आरोग्याच्या तक्रारी तोंड वर काढू शकतात. वरिष्ठांबरोबर संवाद चांगला राहील. तुमच्या मनात अनेक नवनवीन कल्पना येत असतील, पण त्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार करा. नंतर अमलात आणा. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता. वाहन खरेदीची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसाय-धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते. बँकांची कामे होतील.

चैतन्याने जगाल                                                           

मीन : आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. तुम्ही स्वतःच्या अडचणींवर मात करणार आहात. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळणार आहे. अतिआत्मविश्वास टाळा. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग आणि व्यवसायामध्ये समृद्धी लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवनवीन प्रकल्प समोर येतील, ते नीट विचार करून स्वीकारा. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांमध्ये निश्चित यश येणार आहे. भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर नियंत्रण आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -