Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीWater Break: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार ३ 'वॉटर बेल'!

Water Break: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार ३ ‘वॉटर बेल’!

शरीर हायड्रेट राहण्यासाठी विशेष उपक्रम

विशाखापट्टणम : उन्हाचा वाढता कडाका त्यातच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं घेऊन मुलं शाळेत जातात. उन्हात अंगाची लाही करत गरमीमध्ये मुलं शिक्षण घेतात. अशावेळी बहुतांश मुलं तहान लागल्यावरचं पाणी पितात. या सर्व गोष्टींचा विचार करत आंध्र प्रदेशातील (Andhra pradesh) शिक्षण विभागाने शालेय मुलांकरता विशेष उपक्रम राबवला आहे.

विद्यार्थ्यांचे शरीर हायड्रेट रहावे व त्यांच्या आरोग्यालाही फायदा होण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाला ‘वॉटर बेल’ असे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ३ ‘वॉटर ब्रेक’ देण्यात येणार आहेत. आंध्र पदेशातील शालेय विभागाने विद्यार्थ्यांना सकाळी ९:४५, १०:०५ आणि ११:५० यावेळी पाणी पिण्यासाठी ब्रेक दिला जाईल. जेणेकरून मुलांना पाणी पिण्याची आठवण होईल. तसेच राज्यातील सर्व शाळकरी मुलांना पाणी पिण्यासाठी ३ ‘वॉटर ब्रेक’ घेणे अनिवार्य असणार आहे.

उन्हाळ्यात असे राहिल शरीर हायड्रेट

  • उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातले पाणी अधिक प्रमाणात बाहेर पडले जाते. त्यामुळे शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी दररोज निदान ८ ग्लास पाणी प्यायला हवे.
  • कलिंगड, संत्री, स्ट्रॉबेरी, अननस, मनुका, पीच असे हंगामी फळांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते.
  • तसेच भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोषक घटकही मिळतात. त्यामुळे काकडी, पालक, दुधी भोपळा, वांगी, ब्रोकोली, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर अशा भाज्यांचे सेवन करण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -